Ind vs Aus Hockey Series : ऑस्ट्रेलियाने भारताला सलग तिसऱ्या सामन्यात चारली पराभवाची धूळ! अन् मालिका घातली खिशात

India vs Australia Hockey Series 2024 : पहिल्या दोन लढतींत पराभूत झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी रंगलेल्या तिसऱ्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन हॉकी संघाला कडवी झुंज दिली.
India vs Australia Hockey Series 2024 News Marathi
India vs Australia Hockey Series 2024 News Marathisakal

India vs Australia Hockey Series 2024 : पहिल्या दोन लढतींत पराभूत झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी रंगलेल्या तिसऱ्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन हॉकी संघाला कडवी झुंज दिली. जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून २-१ अशी हार पत्करावी लागली.

हायवर्ड जेरेमी याने दोन गोल करीत ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय निश्‍चित केला. ऑस्ट्रेलियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली असून उर्वरित दोन लढती येत्या १२ व १३ एप्रिलला होणार आहेत.

India vs Australia Hockey Series 2024 News Marathi
Olympic Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मोठी घोषणा! सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू होणार मालामाल

ऑस्ट्रेलियाने पहिल्या लढतीत भारताचा ५-१ असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर ४-२ अशा फरकाने भारताला हरवण्यात त्यांना यश मिळाले होते. मात्र, तिसऱ्या लढतीत पाहुण्या भारतीय संघाकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश व क्रिशन बहादूर पाठक यांनी या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आक्रमण लीलया परतवून लावताना उल्लेखनीय कामगिरी केली. या लढतीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण त्यांना मोठ्या प्रमाणात गोल करण्यात अपयश आले. यावरूनच भारतीय संघाने बचावात केलेल्या कौतुकास्पद प्रदर्शनाची झलक पाहायला मिळते.

India vs Australia Hockey Series 2024 News Marathi
Pakistan Cricket : 'RIP पाकिस्तान क्रिकेट...' मोहम्मद हाफीजच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या क्वॉर्टरमध्ये सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण श्रीजेश याच्या अभेद्य बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. श्रीजेशनंतर पाठक यानेही गोलरक्षक म्हणून अप्रतिम कामगिरी केली. ४०व्या मिनिटांपर्यंत दोन्ही देशांना गोल करता आला नाही. जुगराज सिंगने ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

India vs Australia Hockey Series 2024 News Marathi
Rohit Sharma IPL 2025 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्स? LSG मध्ये होणार सामील, कोचचं मोठं वक्तव्य

रोहिदासची चूक अन्‌ प्रतिस्पर्ध्यांची आघाडी

भारतीय हॉकीपटूंनी तिसऱ्या लढतीत बचावात छान कामगिरी केली; पण ४४व्या मिनिटाला रोहिदास याच्याकडून चूक घडली. भारतीय हॉकीपटूकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूमध्ये अडथळा आणल्याचे कारण देत त्यांना पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. जेरेमी हायवर्ड याने न चूकता गोल केला आणि ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. याप्रसंगी जेरेमी याने श्रीजेशचा बचाव पॉवरफुल स्ट्रोकने भेदला व ऑस्ट्रेलियाचा २-१ असा विजय निश्‍चित झाला. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com