भारतीय हॉकी संघाचा ‘आवाजी’ सराव

वृत्तसंस्था
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देतात. आता या वातावरणात खेळण्याचा सराव होण्यासाठी भारतीय संघ ध्वनिक्षेपकांवर जोरात संगीत वाजवून सराव करणार आहे. 

भारताची लढत होत असताना पंधरा हजारहून जास्त चाहते मैदानात असतील. ते सतत ओरडून प्रोत्साहन देत असताना सहकाऱ्यांशी बोलणेही कठीण होईल. या परिस्थितीत डोळ्यांची भाषा महत्त्वाची असेल. प्रत्यक्ष खेळताना याची गरज भासेल. त्याचा सराव होण्यासाठी त्याच परिस्थितीत सराव आवश्‍यक आहे, असे भारतीय हॉकी मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी सांगितले. हा सराव उद्या मंगळवारी होण्याची शक्‍यता आहे. 

काहीही न बोलता एकमेकांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. आता ही भाषा डोळ्यांची असेल किंवा स्टीक वेगवेगळ्या प्रकारे वरती करून संवाद साधला जाईल. प्रसंगी हात वर करूनही खुणा होऊ शकतील. त्यासाठीचा कोड आम्ही तयार करीत आहोत, असेही हरेंदर यांनी सांगितले. 

प्रेक्षक दहा हजार आहेत की २५ हजार, या गोष्टी लढतीपूर्वीच महत्त्वाच्या असतात. सामना सुरू झाल्यावर लक्ष्य केवळ चेंडूवरच असते. आता समजा खेळाडूंचे लक्ष चाहत्यांकडे गेले, तर या स्पर्धेत फायदाच होईल. स्टेडियममधील चाहते हे आमचा बारावा खेळाडू असतील.
- हरेंदर सिंग, भारतीय मार्गदर्शक.

Web Title: Indian hockey team top