

Flying Start for India Hockey Teams in Asian Games
Sakal
Flying Start for India Hockey Teams in Asian Games : भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही हॉकी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेची सुरुवात धडाकेबाज केली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय मिळवला.
भारताच्या महिला हॉकी संघाने उझबेकिस्तानचा १९-० असा धुव्वा उडवला. पुरुष विभागात दिलप्रीत सिंगने चार नेत्रदीपक गोल केले. महिला विभागात दीपिकाने आठ गोल करीत लक्षणीय खेळ केला.