

Hockey India
Sakal
Indian Hockey Eyes Asian Games Gold and LA 2028 Spot: भारतीय पुरुष हॉकी संघाला नुकत्याच पार पडलेल्या विश्वकरंडकात निराशेचा सामना करावा लागला, मात्र हे अपयश मागे टाकून भारतीय हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेचे जेतेपद पटकावून लॉस एंजेलिस ऑलिंपिकची पात्रता मिळवण्याचे ध्येय भारतीय पुरुष हॉकी संघ बाळगून आहे, अशी माहिती भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी गुरुवारी दिली. भारतीय पुरुष हॉकी संघाकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याची संधी असणार आहे.