
नागपूर : सलग दोन आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत शंभर मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ज्योती यराजीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या जागतिक स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या आपल्या दाव्यावर पाणी सोडावे लागणार आहे. सरावात झालेल्या दुखापतीमुळे तिला मोसमातील इतर सर्व स्पर्धांतूनही माघार घ्यावी लागत आहे.