Sumit Antil : इंडियन ओपन पॅरा भालाफेकपटू; सुमीत अंतीलची विश्वविक्रमी कामगिरी

आजच्या कामगिरीमुळे तो आगामी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठीही पात्र ठरला. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ७५ मीटरपर्यंत भाला फेकणे हे त्याचे लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले होते.
Sumit Antil
Sumit Antilsakal

बंगळूर - दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राच्या कामगिरीने भारतीय भालाफेकपटू चर्चेत असताना टोकियो पॅरालिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुमीत अंतिलने बंगळूर येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एफ ६४ प्रकारात विश्वविक्रम प्रस्थापित करून भारतीय भालाफेकपटूंचे वर्चस्व सिद्ध केले.

Sumit Antil
Mumbai : कोट्यवधी रुपये खड्ड्यात; मुंबईत १४ हजार खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण

सोनिपत (हरियाना) चा असलेल्या २४ वर्षीय सुमीतने ७०.१७ मीटर अंतरावर भाला फेकून गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत प्रस्थपित केलेला स्वतःचाच ६८.६२ मीटरचा विश्वविक्रम मोडीत काढला. तसेच आजच्या कामगिरीमुळे तो आगामी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठीही पात्र ठरला.

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ७५ मीटरपर्यंत भाला फेकणे हे त्याचे लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले होते. टोकियोत सुवर्णपदक जिंकताना त्याने ६८.५५ मीटरचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com