

India Badminton Team
Sakal
Indian Men’s Team Assures Asian Games Medal: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक मंगळवारी पक्के झाले. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य जपानवर ३-० असा दिमाखदार विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन या खेळामध्ये उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाचे किमान ब्राँझपदक पक्के होते.
एकीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले असतानाच दुसरीकडे मात्र भारताच्या महिला बॅडमिंटन संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे त्यांच्या पदक पटकावण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.