

Indian Player Julie Yadav Accident
ESakal
भारताची राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू जूली यादव हिचा लखनौ येथे एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ती एका आंतरशालेय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे पर्यवेक्षण करण्याची तयारी करत होती. ती एलडीए कॉलनीतील एलपीएस शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून काम करत होती. ही घटना पारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौदा मोडजवळ घडली.