Wrestlers Protest : हंगामी समितीच्या बरखास्तीवरून साक्षी मलिक, विनेश फोगाटची टीका

हंगमी समिती रद्द करून संजय सिंग यांच्यासाठी भारतीय कुस्ती फेडरेशनमध्ये सत्ता गाजवण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या निर्णयावर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी टीका केली आहे.
Wrestlers Protest
Wrestlers Protestsakal

नवी दिल्ली : हंगमी समिती रद्द करून संजय सिंग यांच्यासाठी भारतीय कुस्ती फेडरेशनमध्ये सत्ता गाजवण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या निर्णयावर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी टीका केली आहे.

महिला खेळाडूंच्या सन्मानाचा आदर राखण्यावरून साक्षी मलिकने एक्सवरून आपली नाराजी व्यक्त केली. या २१ व्या शतकात आम्ही जिगर दाखवत न्यायासाठी लढत आहोत. महिला कुस्तीपटूंना सुरक्षित वाटण्यासाठी आम्ही लढा देत आहोत, असे साक्षीने म्हटले आहे.

ब्रिजभूषण सिंग हे अध्यक्ष असलेली भारतीय कुस्ती फेडरेशन क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केली. त्यानंतर फेडरेशनची निवडणूक झाली आणि ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग अध्यक्ष झाले;

Wrestlers Protest
IPL New Review System : आयपीएलमध्ये नवी रिव्ह्यू प्रणाली ; पंचांचे निर्णय आता अधिक अचूक अन्‌ वेळेत

परंतु त्यांनीही ब्रिजभूषण यांच्याच फायद्याचे निर्णय घेतल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने त्यांची समितीही बरखास्त करत हंगामी समिती नियुक्त केली होती; परंतु आता भारतीय ऑलिंपिक समितीने हंगामी समितीची आवश्यकता नसून निवडून आलेले फेडरेशनचे पदाधिकारी कुस्ती फेडरेशनचा कारभार सांभाळतील, असा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात साक्षी मलिक आणि विनेश फोगाट पुन्हा आक्रमक झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com