esakal | IPL 2021 : रैनाचा 'धूर' काढणारा षटकार; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina

IPL 2021 : रैनाचा 'धूर' काढणारा षटकार; पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 In UAE : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित 31 सामने युएईच्या मैदानात रंगणार आहेत. गत हंगामातील निराशजनक कामगिरीचे कडते काढण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा ताफा जोरदार तयारी करताना दिसत आहे. चेन्नईचा संघ सर्वात आधी युएईला रवाना होऊन सरावही करत आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीतून संघ दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात करेल.

चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) खेळाडूंची सरावाची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे. नुकताच CSK नं आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैनाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने फटकावलेला चेंडू ज्या ठिकाणी पडला तिथून धूराचे लोट आल्याचे पाहायला मिळते. सुरेश रैनाने देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा: विराटचा मैदानाबाहेर विक्रम; अशी कामगिरी करणारा आशियातील पहिलाच!

रैनाने शेअर केलेल्या व्हिडिओला खास कॅप्शनही देण्यात आले आहे. 'हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया।' या गाण्याच्या ओळी त्याने व्हिडिओ शेअर करताना वापरल्या आहेत. ज्या दिवशी धोनीने अचानक निवृत्ती घेतली त्याच दिवशी रैनाने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली होती. तो आता धोनीसोबत आयपीएलमध्ये खेळताना दिसते. त्याने शेअर केलेला शॉट बघून तो यंदाच्या हंगामात धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते.

हेही वाचा: अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई

रैनाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 सामने खेळले आहेत. यात 33.07 च्या सरासरीसह 136.89 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं 5491 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रैना तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत कोहली विराट कोहली 6076 तर शिखर धवन 5577 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या 13 व्या हंगामातून त्याने माघार घेतली होती. 14 व्या हंगामात तो पुन्हा संघात जॉइन झाला. यातील 6 डावात त्याने 24.60 च्या सरासरीसह 126.80 च्या स्ट्राइक रेटने 123 धावा केल्या आहेत. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. उर्वरित सामन्यात धमाकेदार खेळी करुन संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

loading image
go to top