esakal | IPL चा मुहूर्त ठरला; कधीपासून अन् कोठे रंगणार स्पर्धा

बोलून बातमी शोधा

IPL, BCCI, Cricket
IPL चा मुहूर्त ठरला; कधीपासून अन् कोठे रंगणार स्पर्धा
sakal_logo
By
सुशांत जाधव

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चितकाळ लांबणीवर पडलेल्या इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी 13 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा युएईत रंगणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धाला सुरुवात होणार असून 8 नोव्हेंबरला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्याय येणार आहे. सध्याच्या घडीला भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसतोय. या परिस्थितीत देशात स्पर्धा घेणे शक्य नसल्यामुळे स्पर्धा युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा @सकाळSports बेव आणि फेसबुक पेज 

आयपीएल गव्हर्निंग समितीची पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक आणि इतर बाबींवर शिक्कामोर्तब होणार आहे. बीसीसीआयने त्यांचा आराखडा फ्रेंचायजींना सांगितला आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी  टी-20 विश्वचषक  स्पर्धा खेळवण्यात येणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय सप्टेंबरमध्ये होणाऱी आशियाई चषक स्पर्धाही स्थगित झाल्याने अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला.