PV Sindhu : माद्रिद ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

भारताची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिचे माद्रिद ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. थायलंडच्या सुपानिदा केटथाँग हिने सिंधूवर तीन गेममध्ये (२४-२६, २१-१७, २२-२०) रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
PV Sindhu
PV Sindhusakal

माद्रिद : भारताची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिचे माद्रिद ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. थायलंडच्या सुपानिदा केटथाँग हिने सिंधूवर तीन गेममध्ये (२४-२६, २१-१७, २२-२०) रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पी. व्ही. सिंधू - सुपानिदा केटथाँग यांच्यामधील लढतीत पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. सिंधूने अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावला आणि २६-२४ असा विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली.

थायलंडच्या खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन केले. हा गेम तिने २१-१७ असा जिंकत बरोबरी साधली. अखेरच्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र सुपानिदा हिने हा गेम २२-२० असा आपल्या नावावर केला आणि पुढे पाऊल टाकले. सिंधूचा एक तास व १७ मिनिटांत पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com