ठरलं! पीव्ही सिंधू निवडणुकीच्या मैदानात |BWF Athletes Commission Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pv sindhu.
ठरलं! पीव्ही सिंधू निवडणुकीच्या मैदानात

ठरलं! पीव्ही सिंधू निवडणुकीच्या मैदानात

भारताला दोन ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी पीव्ही सिंधू निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की ती नेमकी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? सिंधू जी निवडणूक लढणार आहे तीराजकीय नाही तर बॅडमिंटन फेडरेशनची आहे. BWF अ‍ॅथलिट आयोगाच्या निवडणुकीत तिने सहभाग घेतलाय.

सध्याच्या घडीला सिंधी बाली येथे इंडोनेशिया ओपन स्पर्धेत खेळत आहे. तिने सहा पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाग घेतला आहे. या निवडणुकीत एकूण 9 उमेदवार आहेत. BWF अ‍ॅथलिट आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते 2025 या कार्यकाळासाठी होणाऱ्या नियुक्तीसाठी 17 डिसेंबर 2021 ला निवडणूक पार पडेल. स्पेनमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल.

हेही वाचा: WBBL हरमनप्रीतने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय

विद्यमान खेळाडूंमध्ये केवळ सिंधू दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे. यापूर्वी 2017 मध्येही सिंधूने या निवडणुकीत बाजी मारली होती. यंदाच्या निवडकीत सह महिला खेळाडूंचा समावेश आहे. यात इंडोनेशियाची महिला टेनिस स्टार ग्रेसिया पोली हिचाही समावेश आहे. तिने टोकियोमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. सिंधूला मेमध्ये आयओसीच्या ‘बिलीव्ह इन स्पोटर्स ’ अभियानात निवड करण्यात आली होती.

loading image
go to top