भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याची जगातील सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून निवड झाली आहे. हा पुरस्कार जिंकलेला मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू आहे.

मुंबई - भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याची जगातील सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून निवड झाली आहे. हा पुरस्कार जिंकलेला मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू आहे. मनप्रीतने या स्पर्धेत बेल्जियमचा आर्थर व्हॅन डॉरेन तसेच अर्जेंटिनाचा ल्युकास व्हिला यास मागे टाकले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनप्रीतने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो 260 आंतरराष्ट्रीय लढती खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिक पात्रता मिळवली. ""गतवर्षी आम्ही ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य साध्य केले. आमच्या संघात अनेक नवोदित स्थिरावत आहेत. ऑलिंपिक स्पर्धेसाठी त्यांनी लवकरात लवकर तयार होणे महत्त्वाचे आहे,'' असे मनप्रीतने सांगितले. 

हेही वाचा : ऑलिंपिक तयारीस १.३ कोटींची मंजुरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian team captain Manpreet Singh is the best hockey player in the world