ऑलिंपिक तयारीस १.३ कोटींची मंजुरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मिशन ऑलिंपिक सेलने ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी अतिरिक्त १.३ कोटी रुपये मंजूर केले. त्याचा फायदा ॲथलेटिक्‍स, नेमबाजी, जलतरण तसेच पॅरा स्पोर्टसच्या क्रीडापटूंना होईल.

नवी दिल्ली -  भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मिशन ऑलिंपिक सेलने ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी अतिरिक्त १.३ कोटी रुपये मंजूर केले. त्याचा फायदा ॲथलेटिक्‍स, नेमबाजी, जलतरण तसेच पॅरा स्पोर्टसच्या क्रीडापटूंना होईल.

टॉप्सअंतर्गत दिल्या जात असलेल्या आर्थिक साह्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर नव्या प्रस्तावांचा विचार करण्यात आला. भालाफेक स्पर्धेतील रोहित यादव तसेच शिवपाल सिंग यांना साहित्य मंजूर करण्यात आले, त्याचबरोबर मिराज अहमद खान आणि चिंकी यादव या नेमबाजांच्या प्रस्तावासही हिरवा कंदील दाखवण्यात आला. सायकलिंग महासंघास नव्या सायकल तसेच साहित्य खरेदीसाठी साह्य मान्य करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खेळाडूंना साहित्यासाठी निधी
पॅरा तिरंदाज हरविंदर सिंग, विवेक चिकारा, राकेश कुमार, शाम सुंदर यांना साहित्यासाठी मंजुरी देण्यात आली. जलतरणपटू श्रीहरी नटराज यांना साहित्यासह क्‍लब, मार्गदर्शक तसेच अन्य शुल्कांसाठी साह्य करण्याची मागणीही केली. सुकांत कदम, सुहास याथिराज, मनोज सरकार, प्रमोद भगत, तरुण तसेच कृष्णानगर या पॅरा बॅडमिंटनपटूंना स्पेनमधील स्पर्धेस मदत करण्याचे ठरले.

- 'बिझी' सौरव दादा सचिनला म्हणाला, 'तू नशीबवान आहेस मित्रा!'

कुस्तीगीर उत्कर्ष काळेला वगळले
संदीप तोमर आणि उत्कर्ष काळे या कुस्तीगिरांना टॉप योजनेतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय पुरुष रिकर्व्ह तिरंदाजीत अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे त्यांच्यावर गच्छंती सुरू झाली आहे. अव्वल तिरंदाज अतुल वर्मा याला टॉप गटातून विकास गटात नेण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Olympic preparations approve 1.3 crores