कोरियाशी बरोबरीसह भारतीय संघ अपराजित

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

डाँगहाई सिटी (दक्षिण कोरिया) - भारताने पाचव्या आशियाई चॅंपियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत यजमान दक्षिण कोरियाशी १-१ अशी बरोबरी साधली. याबरोबरच भारताने साखळीत अपराजित मालिका कायम राखली. भारताची रविवारी सकाळी ११.३० वाजता कोरियाशीच निर्णायक लढत होणार आहे.

सनराईझ स्टेडियमवर बचावपटू सुनिता लाक्रा हिच्या नेतृत्वाखालील संघाचा हा चौथा सामना होता. कोरियाने वेगवान सुरवात करूनही भारताने चौथ्याच मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण ड्रॅग-फ्लीकर गुरजीत कौरचा फटका कोरियाच्या गोलरक्षिकेने पॅडने अडविला. भारताने यानंतर केलेले आक्रमण कोरियाने थोपविले.

दुसऱ्या सत्रात कोरियाने पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. सेऊल कि चिऑन हिने ड्रॅग-फ्लीकवर नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारलेला फटका भारताची गोलरक्षिका सविता हिला अडविता आला नाही. त्यानंतर कोरियाने बचावात्मक खेळ करीत भारताची कोंडी केली.

तिसऱ्या सत्रात दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. भारताच्या चुकीमुळे कोरियाला चौथ्या सत्राच्या प्रारंभी पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर केलेला प्रयोग कोरियाला भोवला. त्यानंतर आघाडी फळीतील लालरेमसियामीने भारताला ४९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. त्यावर गुरजीत कौरने मारलेला फटका प्रतिस्पर्धी गोलरक्षिकेच्या पॅडला लागला. रिबाऊंडवर लालरेमसियामीने झेप टाकत संधी साधली. भारताने बरोबरी साधल्यानंतर खेळाचा वेग आणखी वाढला. कोरियाला ५४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण सविताने अचूक बचाव केला.

दृष्टिक्षेपात
भारतीय संघ गुणतक्‍त्यात अव्वल
या पूर्वीच्या तीन सामन्यांत भारत विजयी
याआधी जपान (४-१), चीन (३-१) आणि मलेशिया (३-२) असे विजय
ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरचा कारकिर्दीतील ५०वा सामना

Web Title: Indian team unbeaten with Korea equaling