भारताच्या 18 वर्षीय गोलंदाजाने 11 धावा देत घेतल्या 10 विकेट्‌स 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : एकाच डावात दहा विकेट्‌स घेण्याचा पराक्रम करणाऱ्यांच्या यादीत ईशान्य भारतातील 18 वर्षीय गोलंदाज रेक्‍स राजकुमारसिंह याने स्थान पटकाविले आहे. कूचबिहार करंडक स्पर्धेत त्याने ही विक्रमी कामगिरी केली. 

'आयसीसी क्रिकेट डॉट कॉम' या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, 19 वर्षांखालील कूचबिहार करंडक स्पर्धेत मणिपूरकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध रेक्‍स राजकुमारसिंहने दहा विकेट्‌स घेतल्या. 

अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात रेक्‍स राजकुमारसिंहने एकूण 9.5 षटके गोलंदाजी केली. त्यापैकी तब्बल सहा षटके निर्धाव होती. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या रेक्‍स राजकुमारसिंहने केवळ 11 धावा देत 10 गडी बाद केले. विशेष म्हणजे, त्याने पाच फलंदाजांचा त्रिफळा उडविला. दोन फलंदाज पायचीत झाले, दोन फलंदाज यष्टिरक्षकाकडे, तर एक फलंदाज क्षेत्ररक्षकाकडे झेल देऊन बाद झाले. या दहा षटकांमध्ये रेक्‍स राजकुमारसिंहला तब्बल तीनदा हॅटट्रिकच्या संधी होत्या. 

त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर अरुणाचल प्रदेशचा डाव केवळ 36 धावांमध्ये संपुष्टात आला. प्रथम फलंदाजी करताना अरुणाचल प्रदेशने 138 धावा केल्या होत्या. मणिपूरचा पहिला डाव 122 धावांमध्ये संपुष्टात आला होता. दुसऱ्या डावात अरुणाचल प्रदेशला 36 धावांमध्येच गुंडाळल्याने मणिपूरसमोर विजयासाठी 55 धावांचे आव्हान होते. हे आव्हान मणिपूरने 7.5 षटकांत एकही गडी न गमावता पार केले. 

यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत रेक्‍स राजकुमारसिंहने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या डावातही पाच गडी बाद केले होते. सामन्यात त्याने एकूण 15 गडी बाद केले.

Web Title: Indian teen bowler gets all 10 wickets in an innings