World Test Championship : यशस्वी, ऋतुराज कसोटी संघात

चेतेश्वर पुजारा, उमेशला वगळले

 ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडsakal

मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना गमावल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय कसोटी संघात बदल झाले. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी अनुभवी; परंतु सूर हरपलेल्या चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली. कसोटी संघातले आपले स्थान पुन्हा हक्काने मिळवणाऱ्या अजिंक्य रहाणेला पुन्हा उपकर्णधार करण्यात आले.

पुढील महिन्यात भारताचा संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार असून दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठीचे संघ आज जाहीर करण्यात आले, तर टी-२० मालिकेचा संघ नंतर जाहीर करण्यात येईल, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. जागतिक कसोटी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर भारतीय संघात बदल अपेक्षित होते.


 ऋतुराज गायकवाड
Nana Patole : राज्यात सुलतानी सरकार; अन्नदाता शेतकऱ्यावर पुन्हा संकटाचे सावट - नाना पटोले

यशस्वी, ऋतुराजला प्रथमच संधी

देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलही गाजवणाऱ्या यशस्वी जयस्वालसह ऋतुराज गायकवाड यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता होती आणि तसेच घडले. ऋतुराजला तर एकदिवसीय मालिकेसाठीही स्थान देण्यात आले आहे.


 ऋतुराज गायकवाड
Mumbai Crime : पैसे कमविण्यासाठी मुंबईत घातपाताची धमकी; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

उमेशला वगळले; शमीला विश्रांती

विदर्भचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला वगळण्यात आले, तर आशिया करंडक आणि विश्वकरंडक डोळ्यांसमोर ठेवून मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली. त्यांच्याऐवजी मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना संधी देण्यात आली.

कसोटी संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उकर्णधार), केएस भारत, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सीराज, उम्रान मलिक आणि मुकेश कुमार.

मालिकेचा कार्यक्रम

  • १२ ते १६ जुलै ः पहिली कसोटी (डॉमनिका)

  • ः भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० पासून

  • २० ते २४ जुलै ः दुसरी कसोटी (त्रिनिनाद)

  • सायंकाळी ७.३० पासून

  • २७ जुलै ः पहिला एकदिवसीय सामना

  • (बार्बाडोस) सायंकाळी ७ पासून

  • २९ जुलै ः दुसरा एकदिवसीय सामना

  • (बार्बाडोस) सायंकाळी ७ पासून

  • १ ऑगस्ट ः तिसरा एकदिवसीय सामना

  • (त्रिनिनाद) सायंकाळी ७ पासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com