Hockey World Cup: भारताची गच्छंती, क्वार्टर फायनलमध्ये ०-१ असा पराभव

Hockey World Cup: भारताची गच्छंती, क्वार्टर फायनलमध्ये ०-१ असा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाला एफआयएच हॉकी महिला विश्वचषक २०२२ मध्ये त्यांच्या क्रॉसओव्हर सामन्यात यजमान स्पेनकडून ०-१ ने पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक होते. मात्र, पराभवामुळे भारताचा आगामी मार्ग खडतर झाला आहे.(Indian Women Hockey Team Lost 0-1 To Hosts Spain Win Match At The FIH Hockey Women World Cup 2022)

मार्टा सेगू (57') हिने सामन्यातील एकमेव गोल केला. भारतीय महिला संघ पुढील 9व्या ते 16व्या स्थानाच्या सामन्यात कॅनडाविरुद्ध खेळेल.

भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. गुरुवारी म्हणजेच ७जुलै नेदरलँड्समधील अॅमस्टेलवेन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने 4-3 असा विजय मिळवला. अशाप्रकारे टीम इंडिया ब गटातील एकही सामना जिंकू शकली नाही. यापूर्वी भारतीय संघ केवळ इंग्लंड आणि चीनविरुद्धचा सामना ड्रॉ करू शकला होता. दोन्ही सामन्यात स्कोअर 1-1 असा होता.

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक होते संघाच्या पदरी निराशा पडली. यानंतर टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी स्पेसविरुद्ध क्रॉसओव्हर सामना खेळावा लागला, ज्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

क्रॉसओव्हर सामन्यांचे नियम काय आहेत?

स्पर्धेच्या स्वरूपानुसार, 16 संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक पूलमधील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ क्रॉसओव्हर होतील.

क्रॉसओव्हरमध्ये, पूल ए मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना डी पूलमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल, तर पूल अ मध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना डी पूलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल.

त्याचप्रमाणे ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना क गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. तर पूल ब मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला संघ पूल सी मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. या चार सामन्यांतील विजेते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com