India Ice Hockey Medal: चक दे! भारताच्या पोरींनी बर्फात इतिहास घडवला, आईस हॉकीमध्ये जिंकलं ऐतिहासिक मेडल
Indian Women’s Ice Hockey Team Clinches Bronze: भारताच्या महिला आईस हॉकी संघाने आशिया कप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. हे पहिलेच पदक असल्याने ऐतिहासिक ठरले.
भारताच्या महिला आईस हॉकी संघाने इतिहास रचला आहे. या संघाने नुकतेच आशिया कप स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. ६ जून रोजी त्यांनी हा कारनामा केला असून ७ जूनला त्यांचे भारतात स्वागत करण्यात आले.