भारतीय महिलांची दमदार आगेकूच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

जाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून सलग चार विजयांसह आपली उपांत्य फेरी निश्‍चित केली. 

जाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून सलग चार विजयांसह आपली उपांत्य फेरी निश्‍चित केली. 

सकाळच्या सत्रात झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताच्या प्रत्येक खेळाडूचे योगदान राहिले. रणबीर कौरच्या ताकदवान चढाया, पायलच्या खोलवर चढाया आणि राखीव खेळाडू म्हणून पुन्हा एकदा संधीचे सोने करणाऱ्या पुण्याच्या सायली केरिपाळेची सुपर रेड या भारतीय विजयाच्या लक्षवेधी गोष्टी ठरल्या. रितू नेगी आणि साक्षी कुमारी यांनी केलेल्या पकडीही निर्णायक ठरल्याने त्यांना आज विजय मिळविण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेला 38-12 असे पराभूत केले. त्यानंतर यजमान इंडोनेशियाच्या मुलींनी कबड्डीच्या तंत्राचे धडे देत 54-22 असा विजय मिळविला. भारतीय महिलांनी साखळीतील चारही लढती जिंकून आपले आघाडीचे स्थान राखले आहे. 

भारतीय पुरुष संघ आज पुन्हा विजयी मार्गावर आला. कोरियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यावर आज भारतीय पुरुष संघाचा थायलंडच्या खेळाडूंनी कस पाहिला. पदकाच्या शर्यतीत अडसर असणारे दुसऱ्या गटातील इराण आणि पाकिस्तान संघ मोठ्या फरकाने विजय मिळवत असताना भारतीय पुरुषांना थायलंडविरुद्ध 49-30 अशा विजयावर समाधान मानावे लागले. पुरुष संघाने तीन विजय मिळविल्याने त्यांची उपांत्य फेरी निश्‍चित असली, तरी तेथे त्यांची गाठ इराण किंवा पाकिस्तान यांच्यापैकी एकाशी गाठ पडू शकते. दुसऱ्या गटातून या दोघांमधील लढत त्या गटातील विजेता निश्‍चित करेल. 

Web Title: Indian women strong ahead