Asian Games 2023 : सर्वात मोठा धक्का! विश्वविजेत्या चिनी खेळाडूंवर मात, टेबल टेनिसमध्ये भारताचे पदक निश्चित

Asian Games 2023 Table Tennis
Asian Games 2023 Table Tennisesakal

Asian Games 2023 Table Tennis : सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या भारताच्या महिला टेबल टेनिस खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वात मोठ्या धक्कादायक निकालाची नोंद तर केलीच, पण त्याबरोबर पदकही निश्चित केले.

सुतीर्थ आणि अहिका यांनी चीनच्या विश्वविजेत्या टेन मेंग आणि यिदी सँग या जोडीचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत त्यांनी ११-५, ११५.५-११, ११-९ असा विजय मिळवला.

Asian Games 2023 Table Tennis
Asian Games 2023 : ऐतिहासिक विजय! हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला 10-2 नं चारली धूळ

चीनची ही विश्वविजेती जोडी जागतिक मानांकनात दुसऱ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताला महिला दुहेरीत आतापर्यंत एकही पदक मिळालेले नाही. त्यामुळे सुतीर्थ आणि अहिका यांचा पदक निश्चित करणारा हा विजय अभिमानास्पद आहे.

एकीकडे मनिका बत्रासारखी अनुभवी खेळाडू महिला एकेरीत पराभूत होत असताना सुतीर्थ आणि अहिका यांचा विश्वविजेत्या जोडांविरुद्ध कसा निभाव लागणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती; परंतु या भारतीय महिलांनी अनुभवी चीनच्या खेळाडूंना लयच मिळवू दिली नाही. पहिला गेम ८ मिनिटांत जिंकला. तेथेच भारतीयांनी सनसनाटी निर्माण केली.

Asian Games 2023 Table Tennis
Asian Games: 10,000 मीटर शर्यतीत भारतीय खेळाडूंची 'चांदी'; कार्तिक कुमारला रौप्य तर गुलवीर सिंगला कास्य

हाच चमकदार खेळ सुतीर्थ आणि अहिका यांनी कायम ठेवत दुसरा गेम ९ मिनिटांत जिंकला. चीनच्या खेळाडू फीरहँडवर चुका करत होत्या. त्याचा फायदा भारतीयांना झाला. मात्र त्यांनी जोरदार खेळ करत तिसरा गेम जिंकला परंतु लय सापडलेल्या भारतीयांनी चौथा गेम जिंकून चीनच्या खेळाडूंचा खेळ खल्लास केला.

तत्पूर्वी आज सकाळच्या सत्रात झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत मनिकाचा जागतिक क्रमवारीत ४ थ्या स्थानावर असलेल्या विदो बंगकडून ८-११, १२-१०. ६-११. ४-११. १४-१२, ५-१२ अशी हार झाली. मनिकाच्या या पराभवामुळे एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com