तानियामुळे भारतीय महिला संघ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tania Sachdev

तानियामुळे भारतीय महिला संघ विजयी

मामल्लापुरम : भारताच्या तानिया सचदेव हिने बुद्धिबळाच्या पटावर एकापेक्षा एक अशा चाली रचल्या आणि झेडसोका गाल हिला पराभूत केले. तानियाच्या या विजयामुळे भारताच्या महिला अ संघाला बुद्धिबळ ऑलिंपियाड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये हंगेरीविरुद्ध २.५-१.५ असा मिळवता आला. कोनेरू हंपी, द्रोणावल्ली हरिका व आर. वैशाली या भारताच्या तीन महिलांना ड्रॉ अर्थातच बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

त्यामुळे या लढतीची मदार तानियावर होती. तिने छान खेळ करताना भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. दरम्यान, भारताच्या महिला ब संघाने इस्तोनियाला २.५-१.५ अशा फरकाने हरवले. वंतिका अग्रवाल हिने या लढतीत विजय मिळवला.

करुआनाचा पराभव

सोमवारी धक्कादायक पराभवाची नोंद झाली. उझ्बेकिस्तानच्या नोडीरबेक अबदूसत्तारोव याने माजी विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील चॅलेंजर फॅबियानो करुआना याला पराभवाचा धक्का दिला.

Web Title: Indian Women Team Won Chess Olympiad Competition By Tania Sachdev

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..