esakal | प्रिया मलिकनं पटकावलं सुवर्ण, देशाची मान उंचावली
sakal

बोलून बातमी शोधा

Priya Malik

प्रिया मलिकनं पटकावलं सुवर्ण, देशाची मान उंचावली

sakal_logo
By
सुशांत जाधव

World Wrestling Championship Latest Ttrending News: एका बाजुला ऑलिम्पिकचा (Tokyo Olympics) महाकुंभ मेळा सुरु असताना जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेतून (World Wrestling Championship) भारतीयांसाठी गूड न्यूज आलीये. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिक (Priya Malik) ने हंगेरीतील स्पर्धेत गोल्डन कामगिरी केलीये. तिने 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले आहे. (indian wrestler priya malik wins gold at world wrestling championship know about her latest trending news)

प्रियाच्या या दमदार कामगिरीनंतर तिच्या प्रशिक्षकांनी आगामी ऑलिम्पिकमध्ये ती देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केलाय. प्रियाच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावच होताना दिसतोय. हंगेरीच्या बूडापेस्टमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर विजयी जल्लोश करतानाचा प्रियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Olympics : जुळ्या बहिणींनी-सायना अंकिताचा खेळ केला खल्लास!

हेही वाचा: Olympics : तिच्या पिस्टलसह लाखो भारतीयांचे स्वप्न तुटले!

काही नेटकऱ्यांच्या मनात भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याचा गोंधळ उडाला आहे. ही ऑलिम्पिक स्पर्धा नाही. निश्चितच तिने ज्या प्रमाणे कामगिरी केलीये तशीच कामगिरी ऑलिम्पिकमधील भारतीय कुस्तीपटूंनी करतील, अशी आस आहे. अद्याप ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती क्रीडा प्रकाराला सुरुवात झालेली नाही.

23 जुलैपासून टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीये. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंग प्रकारात मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळवून दिले. तिने रौप्य पदकाची कमाई केली. तिसऱ्या दिवशी महिला 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या पदरी निराशा आली. पदकाची आस असलेल्या मनु भाकेर आणि यशस्विनी सिंह जयस्वाल या दोघी पात्रता फेरीतच अडकल्या. बॅडमिंटनच्या कोर्टवर महिला दुहेरीत सानिया मिर्झाने युवा अंकिता रैनाच्यासाठीने दमदार सुरुवात केली. पण या जोडीलाही पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. बॅडमिंटन कोर्टवर पीव्ही सिंधूने नावाला साजेसा खेळ करत स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवलीये. पुरुष नेमबाजीतही तिसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशा आली.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला भारताचा नेमबाज दिव्यांश पनवार आणि दीपक कुमार या दोघांनाही 10 मीटर एअर रायफल इवेंटमध्ये फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंगसह देशाला कुस्तीमध्ये पदकाची आशा आहे. कुस्तीमध्ये पुरुष गटात बजरंग पुनिया तर महिला गटात विनेश फोगट यांच्याकडून पदकाची आस आहे. ते या स्पर्धेत कशी कामगिरी करणार याची कुस्ती शौकीनांमध्ये चांगलीच उत्सकता पाहायला मिळते..

loading image
go to top