ग्रीको रोमनमध्ये पाटी कोरीच

कुस्तीगीर सुनील एकतर्फी लढतीत पराजित झाला
कुस्तीगीर सुनील एकतर्फी लढतीत पराजित झाला

मुंबई : जागतिक कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची मोहीम पदक न जिंकता तसेच ऑलिंपिक पात्रता न मिळवताच संपली. रवीने 97 किलो गटात मिळवलेला विजय सोडल्यास भारताच्या हाती काहीच लागले नाही.

नूर सुलतान (कझाकस्तान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रवी दुसऱ्या फेरीत, तर मनीष (67 किलो) आणि सुनील कुमार (87 किलो) हे पहिल्याच फेरीत पराजित झाले. पहिल्या दिवशी चार कुस्तीगीर पहिल्याच फेरीत पराजित झाले होते. त्यातील तिघांना एकही गुण जिंकता आला नव्हता. दुसऱ्या दिवशी पराजित झालेल्या तीनही लढतीत मिळून एकच गुण जिंकता आला. भारतीयांना हरवलेले कुस्तीगीर लगेचच्याच फेरीत पराजित झाले आणि रिपेचेजच्या आशाही संपल्या.

रवीने तैवानच्या चेंग हाओ चेन याला 5-0 असे हरवून आश्‍वासक सुरुवात केली होती, पण चेक प्रजासत्ताकच्या आर्तुर ओमारोव याच्याविरुद्ध रवी फार काही करू शकला नाही. सुरुवातीपासून रवीला बचावावर जावे लागले. त्याचे गुण टाळण्याचे प्रयत्न विफल ठरले आणि तो 0-7 पराजित झाला.

मनीषने 1-0 आघाडी घेतली, पण त्यानंतर त्याने बल्गेरियाच्या डेव्हिद तोहिमोरीव दिमीत्रोवविरुद्ध सलग दहा गुण गमावले. सुनील अमेरिकेच्या जोसेफ पॅट्रिकविरुद्ध 0-6 असा पराभूत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com