.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Vinesh Phogat News: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा २५ ऑगस्ट रोजी ३० वा वाढदिवस होता. तिच्या या वाढदिवशी तिचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. तिला हरियाणामध्ये सर्वखाप पंचायतीकडून सुवर्ण पदक देत गौरविण्यात आले.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत विनेशने जी कामगिरी केली, त्याबद्दल तिचा हा गौरव करण्यात आला. ती ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती. मात्र, या स्पर्धेदरम्यान मोठा ट्वीस्ट आला.
अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन नियमापेक्षा अधिक भरले. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आणि तिने उपांत्य फेरीत पराभूत केलेल्या स्पर्धकाला अंतिम सामन्यात स्थान देण्यात आले. त्यामुळे विनेशचे पदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले.