esakal | चौथ्या कसोटीत भारतीय चुका सुधारणार की ‘येरे माझ्या मागल्या’
sakal

बोलून बातमी शोधा

pune

चौथ्या कसोटीत भारतीय चुका सुधारणार की ‘येरे माझ्या मागल्या’

sakal_logo
By
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा

दिल्ली : इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना गमावण्यात म्हातारी मेल्यापेक्षा काळ सोकावेल अशी स्थिती भारतीय संघाची झाली आहे. भारतीय फलंदाजांचे दोष इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर उघड झाले. उद्यापासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आपल्या दोषांवर मात करणार की पुन्हा त्याच चुका करणार, यावर चौथ्या कसोटीत भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. (Ind Vs Eng Cricket News)

इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना गमावण्यात म्हातारी मेल्यापेक्षा काळ सोकावेल अशी स्थिती भारतीय संघाची झाली आहे. भारतीय फलंदाजांचे दोष इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर उघड झाले. उद्यापासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आपल्या दोषांवर मात करणार की पुन्हा त्याच चुका करणार, यावर चौथ्या कसोटीत भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी जाहीर होणार टीम इंडिया

लॉर्ड्‌सवरील दुसऱ्या कसोटीपर्यंत झगडणाऱ्या इंग्लंड संघाच्या पंखात अचानक बळ जाणवू लागले आणि भारतीय फलंदाजांना स्विंग गोलंदाजी का खेळता येत नाही याची चर्चा लगेचच सुरू झाली. ओव्हल मैदानावर चौथा कसोटी सामना होताना गेल्या सामन्यातील पराभवाने दुखावलेला भारतीय संघ जोरदार पुनरागमन करायच्या तयारीत आहे. विराट कोहलीवर अश्विनला खेळवण्याचे दडपण वाढत आहे. नासीर हुसेनच्या मते भारतीय फलंदाजांच्या तंत्रात त्रुटी आहेत. भारतीय फलंदाजांना स्विंग होणाऱ्या चेंडूचा अंदाज येत नाही. टप्पा पडून चेंडू आत येणार का बाहेर जाणार हे समजत नसल्यामुळे ते चाचपडत खेळत आहेत. इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाला हात मोकळे करून दिले नाहीत. दिशा सतत उजव्या यष्टीच्या बाहेरची होती आणि टप्पा असा होता, की क्रीजमध्ये मागे सरकत बॅकफूटवर फटके मारणे शक्य झाले नाही.

हेही वाचा: विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

भारताचे ३, ४, ५ क्रमांकाचे प्रमुख फलंदाज गेल्या वर्षात २५ च्या सरासरीने फलंदाजी करू शकलेले नाहीयेत ही मुख्य चिंतेची बाब आहे. चौथ्या सामन्यात पुजारा- कोहली- रहाणेवर संघाकरता गरजेच्या धावा जमा करायची मोठी अपेक्षा असणार आहे आणि आता कोणत्याही सबबी ऐकायला क्रिकेट चाहते तयार नाहीत. रोहित शर्माचा सन्माननीय अपवाद वगळता कोणताच भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करू शकत नसल्याने खराब कामगिरी करूनही कोणा फलंदाजाला वगळले जाण्याची शक्यता कमी वाटत आहे.

इतिहास तपासता ओव्हल मैदानावरची खेळपट्टी स्विंग गोलंदाजीला त्या मानाने कमी साथ देत आली आहे, तसेच चौथ्या-पाचव्या दिवशी फिरकीला साथ मिळायची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंड संघात तीन डावखुरे फलंदाज असल्याने भारतीय संघातून आता तरी अश्विनला संधी मिळेल असे वाटते. इंग्लंड संघात सॅम करनची जागा ख्रीस वोक्स घेण्याची शक्यता आहे.

loading image
go to top