esakal | T20 World Cup: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी जाहीर होणार टीम इंडिया
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

T20 World Cup: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी जाहीर होणार टीम इंडिया

sakal_logo
By
विराज भागवत

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी

T20 World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच टी २० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर भारताचा ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी, ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी तर पुढील दोन सामने ५ आणि ८ नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये कोणाकोणाला स्थान मिळणार, याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup: विराट, रोहित नव्हे तर 'या' खेळाडूवर असेल लक्ष!

BCCI च्या संपर्कात असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी संपल्यानंतर भारताचा विश्वचषकासाठीचा संघ घोषित केला जाईल. सोमवार किंवा मंगळवारी टीम इंडिया जाहीर केली जाईल असा आमचा विचार आहे. तारीख मात्र अद्याप ठरवलेली नाही. पण, शुक्रवारी १० सप्टेंबरच्या आधीच संघ जाहीर केला जाईल. कारण संघ घोषित करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर आहे", अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: T20 WC: 'या' टीमला कमी लेखू नका- गौतमचा इतरांना 'गंभीर' सल्ला

"युएईच्या मैदानांचा सर्वाधिक फायदा भारतालाच"

"भारत पाकिस्तान सामना असला की भारताप्रमाणेच पाकिस्तानमधूनही अपेक्षा असतात. सध्याच्या घडीला जर आपण दोन संघ पाहिले तर भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप जास्त तगडा आहे. टी २० क्रिकेट हा प्रकार खूपच विचित्र असतो. या प्रकारात कोणताही संघ कोणत्याही संघाला कधीही पराभूत करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे कोणता संघ वरचढ ठरेल ते टी२० क्रिकेटमध्ये सांगणं कठीण आहे. काही लोक म्हणत आहेत की पाकिस्तानने युएईमध्ये खूप क्रिकेट खेळलं आहे. असं असलं तरीही भारताला युएईतील टी२० वर्ल्डकपचा फायदा जास्त होईल. कारण भारतीय खेळाडू युएईमध्ये आधी महिनाभर IPL खेळणार आहेत. जेव्हा टी२० वर्ल्डकपच्या आधी तुम्ही त्याच मैदानांवर IPL सामने खेळता तेव्हा तुम्हाला वर्ल्डकपच्या तयारीसाठी खूपच चांगला वेळ मिळतो. त्यामुळे भारतालाच याचा जास्त फायदा होईल", असं स्पष्ट मतही भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले.

loading image
go to top