CWG26 India Medal Tally : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली? ऑस्ट्रेलिया शतकासह अव्वल, तर...

India's medals in Commonwealth Games 2026: ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची पदकांची कमाई सातत्याने वाढत आहे. भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग, पॅरा अॅथलेटिक्स, अॅथलेटिक्स आणि बॉक्सिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Commonwealth Games 2026 India medal tally after Day 6

Commonwealth Games 2026 India medal tally after Day 6

esakal

Updated on

Commonwealth Games 2026 India medal tally after Day 6 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा सहावा दिवस नाशिकच्या दिलीप गावितने गाजवला.. पॅरा धावपटू दिलीपने टी ४७ च्या १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि पदकतालिकेत भारताला आगेकूच करण्यास मदत केली. दिलीपसह याच गटात मोहम्मद बसिलने रौप्यपदकाची कमाई केली. लांब उडीत श्रीशंकर मुरलीने रौप्यपदक पटकावले. या तीन पदकांसह भारतीय बॉक्सिंगपटूंनी आपापल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून सहा पदकं निश्चित केली आहेत. भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवसानंतर ३ सुवर्ण, ९ रौप्य व ३ कांस्य अशा एकूण १५ पदकांसह तालिकेत आठव्या स्थानावर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Commonwealth Games
India in Commonwealth Games
Preeti Pawar wins gold Commonwealth Games 2026
Commonwealth 2026
Marathi News Esakal
www.esakal.com