दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रिओ डी जानिरो - भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने ऐतिहासिक कामगिरी करत व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. पात्रता फेरीत ती आठव्या स्थानी राहिली. 

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली भारताची पहिली जिम्नॅस्ट असा लौकिक मिळवलेल्या दीपा कर्माकरने अंतिम फेरीत स्थान मिळविल्याने भारताला पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुण मिळविले. पात्रता फेरीत ती आठव्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली आहे. दीपा ही त्रिपुराची रहिवाशी आहे.

दीपाने व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या प्रयत्नात दीपाने 14.600 गुण मिळविले. तिने आपल्या खेळाडू सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. कॅनडाची जिम्नॅस्ट शॅलोन ओल्सेन हिच्याकडून तिला कडवी लढत मिळाली. पण, ती अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरली. 

महिलांच्या व्हॉल्ट प्रकाराची अंतिम फेरी 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता खेळविली जाईल. दीपाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. दीपाचे अनइव्हन बार, बॅलन्सिंग बिम आणि फ्लोअर एक्सरसाईजमधील आव्हान संपुष्टात आले. दीपाने अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुण मिळविले.

Web Title: India's Dipa Karmakar reaches Final in Rio Olympics

टॅग्स