भारताचा वर्ल्डकप फुटबॉल पात्रता सामना भुवनेश्वरमध्ये

विश्वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीसह २०२७ मधील एएफसी आशिया कप स्पर्धेतील सामना कलिंगा स्टेडियवर होईल
indias first two world cup qualifier games to be held in bhubaneswar
indias first two world cup qualifier games to be held in bhubaneswarSakal

भुवनेश्वर : गतवर्षी फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या ओडिशातील कलिंग स्टेडियमला आणखी एक सन्मान मिळाला आहे. २०२६ च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्रता लढतीत भारताचा कतारविरुद्धचा हा सामना २१ नोव्हेंबरला या मैदानावर होणार आहे.

विश्वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीसह २०२७ मधील एएफसी आशिया कप स्पर्धेतील सामना कलिंगा स्टेडियवर होईल, असा संदेश अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने ओडिशा फुटबॉल संघटनेला पाठवला आहे. ओडिशा हे हॉकीसह भारतीय फुटबॉल सामन्यांच्या संयोजनाचे माहेरघर आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. भुवनेश्वरमध्ये फिफाच्या दर्जाची पाच मैदाने आहेत.

कतारविरुद्धचे सामने आयोजित करण्याची ही संधी आमच्यासाठी गौरवास्पद आहे. ओडिशा राज्याचे फुटबॉलप्रती असलेले प्रेमच यातून दिसून येते असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com