पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत पराभव

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

सिंधूने या स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवीत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम फेरीत तिला तैवानच्या तई तुझू यिंग हिने 21-15, 21-17 असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.

हॉंगकॉंग - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधून हाँगकाँग ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामेरे जावे लागले. 

सिंधूने या स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवीत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम फेरीत तिला तैवानच्या तई तुझू यिंग हिने 21-15, 21-17 असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. तई यिंग सामन्याच्या सुरवातीपासूनच वर्चस्व कायम ठेवले होते.

पहिल्या गेममध्ये सिंधूला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, तई यिंगच्या ताकदवान फटक्यांसमोर सिंधू अपयशी ठरली. दुसऱ्या गेममध्ये पिछाडी असूनही सिंधूने कमबॅक केले होते. पण, अखेरच्या क्षणी तई यिंगने पॉईंट मिळवीत विजेतेपद पटकाविले. सिंधूने नुकतेच सुपर सिरीज स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकाविले होते. तिला सलग दुसरे विजेतेपद मिळविण्याची संधी होती.

या स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विजेता असलेल्या समीरने कारकिर्दीत प्रथमच सुपर सीरिज स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. समीर हा सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तिसराच भारतीय ठरला. आता त्याच्यासमोर स्थानिक खेळाडू एन्जी का लॉंग अँगस याचे आव्हान असेल.

Web Title: India's PV Sindhu loses to Chinese Taipei's Tai Tzu-ying 15-21, 17-21 in Hong Kong Open Super Series final