महिला नेमबाज पात्रता फेरीतच अपयशी

वृत्तसंस्था
शनिवार, 6 ऑगस्ट 2016

रिओ डि जानिरो : पदकासाठी भारतीयांची आशा असलेल्या नेमबाजांच्या पहिल्या स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेला आणि अयोनिका पॉल या दोघींनाही अंतिम फेरी गाठण्यात आज (शनिवार) अपयश आले. यामुळे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. 

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अयोनिका पॉल आणि अपूर्वी चंडेला या दोन नेमबाज होत्या. पण सुरवातीपासूनच त्या पिछाडीवर पडल्या. पात्रता फेरीमध्ये अपूर्वी 34 व्या स्थानावर राहिली. तिने एकूण 411.6 गुण मिळविले. अयोनिका पॉल 43 व्या स्थानावर राहिली. अयोनिकाला एकूण 407 गुणच मिळविता आले. 

या स्पर्धेत एकूण 51 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यापैकी पहिल्या आठच खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. आठव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या यी सिलिंगने 415.9 गुण मिळविले आहेत. या पात्रता फेरीमध्ये अव्वल क्रमांक पटकाविलेल्या चीनच्याच ड्यु ली हिने 420.7 गुण मिळवित ऑलिंपिक विक्रम नोंदविला.

Web Title: India's shooters did not reach Finals in Rio Olympics