
नवी दिल्ली : व्यवस्थापनेच्या चुकीमुळे जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील पदक हुकलेल्या भारताच्या सहा बॅडमिंटनपटूंचा अखेर पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याचसोबत या प्रकरणाबाबत भारतीय विद्यापीठ संघटनेकडून कठोर पाऊल उचलण्यात आले असून, याअंतर्गत सरचिटणीस बलजीत सिंग सेखो यांना निलंबित करण्यात आले आहे.