Sumit Nagal Australian Open 2024: सुम‍ितने ऑस्ट्रेल‍ियन ओपनमध्ये रचला इत‍िहास! 1989 नंतर ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Sumit Nagal Australian Open 2024 Marathi News
Sumit Nagal Australian Open 2024 Marathi Newssakal

Sumit Nagal Australian Open 2024 News : भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत दमदार कामगिरी करत इत‍िहास रचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत त्याने स्पर्धेत या 31व्या मानांकित अलेक्झांडर बुबलिकचा पराभव केला.

सुमित नागल सुरुवातीपासूनच दोन सेटमध्ये आघाडीवर होता, आणि तिसऱ्या फेरीतही त्याने चमकदार कामगिरी करत बुबलिकचा पराभव केला. सुमित नागलने हा सामना 6-4, 6-2, 7-6(5) ने जिंकला.

नागल 2013 नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. 1989 नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी सामन्यात सीडेड खेळाडूचा पराभव केला आहे.

रमेश कृष्णन यांनी 1989 ही कामगिरी केले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने स्वीडनच्या मॅट्स विलँडरचा पराभव केला. विलँडर तेव्हा टेनिस क्रमवारीत जगातील अव्वल खेळाडू होता.

सुमितने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या मुख्य स्पर्धेत विजय मिळवला आहे. याआधी 2020 च्या यूएस ओपनमध्ये तो मुख्य ड्रॉमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. टेनिस क्रमवारीत अव्वल 100 मध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला त्याने सातव्यांदा पराभूत केले आहे.

काय घडलं मॅचमध्ये?

सुमितने शानदार सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने तीन वेळा अलेक्झांडरची सर्व्हिस तोडली आणि पहिला सेट 6-4 अशा फरकाने सहज जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये तो आणखी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. अलेक्झांडरनेही काही चुका केल्या आणि त्याचा फायदा घेत नागलने दुसरा सेट 6-2 अशा फरकाने जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची लढत झाली आणि टायब्रेकमध्ये नागलने बाजी मारली. त्याने हा सेट 7-6 असा जिंकला आणि सामनाही जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com