esakal | आजपासून इनडोअर हॉल गजबजणार, तीन महिन्यानंतर सरावास सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

indoor

आजपासून इनडोअर हॉल गजबजणार, तीन महिन्यानंतर सरावास सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा व मनपा प्रशासनाने (nagpur municipal corporation) शनिवारी परवानगी दिल्याने आता उद्यापासून शहरातील इनडोअर हॉल (indoor hall open) खुले होणार आहेत. तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बॅडमिंटनसह अन्य खेळांच्या सरावाला सुरुवात (indoor sports practice starts) होणार असल्याने खेळाडू व प्रशिक्षक खूश आहेत. (indoor sports practice starts from today in nagpur)

हेही वाचा: उपयुक्त मनोरंजन : कार्टून देताहेत शेतीचे अपडेट्स; अफलातून पद्धत

प्रशासनाने गेल्या रविवारी आऊटडोअर खेळांच्या सरावाला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर बॅडमिंटन, टेबल टेनिस, मुष्टियुद्ध, नेमबाजी, कुस्ती व इतर इनडोअर क्रीडा प्रकारातील खेळाडूंनीही त्यांच्याकडे सरावाची परवानगी मागितली होती. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी इनडोअरलाही परवानगी मिळाली. त्यामुळे आता उद्या, सोमवारपासून सर्व इनडोअर स्टेडियम व अन्य क्रीडा संकुले गजबजणार आहेत. मनपाच्या मालकीचे हॉल आजपासूनच सरावासाठी खुले होणार होते. मात्र, बऱ्याच दिवसांपासून कुलूपबंद असल्यामुळे स्वच्छता व सॅनिटायझेशन झाल्यानंतर सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबूलकर यांनी दिली.

तब्बल तीन महिन्यांनंतर सरावाची संधी मिळत असल्याने खेळाडूंसह प्रशिक्षक व पदाधिकारीही खुष आहेत. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सराव घेणारे अमित राऊत यांनी प्रशासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. मात्र, त्याचवेळी केवळ सायंकाळी पाचपर्यंतच सरावाची परवानगी दिल्याबद्दल नाराजीही बोलून दाखविली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाउन लागल्यापासून मधल्या काळातील काही दिवसांचा अपवाद वगळता जवळपास आठ महिने इनडोअर हॉल बंद राहिले. याचा खेळाडूंना तर फटका बसलाच, शिवाय प्रशिक्षकांचेही आर्थिक नुकसान झाले. इनडोअर हॉलमधील उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे अनेकांचे उदरनिर्वाहचे साधन आहे. मात्र लॉकडाउनमुळे ही शिबिरे बंद पडल्याने बहुतांश प्रशिक्षक बेरोजगार झाले होते.

loading image