esakal | उपयुक्त मनोरंजन : कार्टून देताहेत शेतीचे अपडेट्स; अफलातून पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

अमोल चौकडे यांनी तयार केलेले कार्टून

उपयुक्त मनोरंजन : कार्टून देताहेत शेतीचे अपडेट्स; अफलातून पद्धत

sakal_logo
By
श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) : बालपणात एकदा तरी कार्टून (Cartoons) बघितले नाही, असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. याच कार्टूनचा उपयोग करून अमोल चौकडे (Amol Chowkde) हे कृषिसहायक अनेक शेतकऱ्यांना मनोरंजक पद्धतीतून शेतीबद्दल मार्गदर्शन (Interesting guide on farming) करीत आहेत. या कार्टून व्हिडिओद्वारे (Cartoon video) त्यांनी बियाणे उगवण क्षमता, फवारणी पद्धत, पट्टापेर पेरणी, सोयाबीन मार्गदर्शन, सोयाबीन पेरणीपूर्वी करावयाची तयारी, खोडमास अळी, जुनी पेरणी व नवीन पेरणीमधील फरक आणि फायदे आदी अनेक विषय साकारले आहेत. (Cartoons-give-farm-updates;-Concept-of-Amol-Chowkde)

मांजरखेड कसबाचे रहिवासी अमोल चौकडे हे बोरी, किरजवळा या परिसरातील गावांना शेती व त्यामधील पीकपद्धतीबाबत मार्गदर्शन करतात. मात्र, कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन करणे थोडे कठीण झाले होते. प्रत्येकाला मार्गदर्शन करणे हे वेळखाऊ असल्याने परिणामकारक ठरू शकत नाही. एकदा शेतीचा फेरफटका मारत असताना गावातील अनेक तरुण झाडाखाली मोबाईलवर गेम व कार्टूनमध्ये व्यस्त असल्याचे त्यांना दिसले व यातूनच आपणही डिजिटल माध्यमांचा वापर करून अनेक शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचू शकतो, ही कल्पना त्यांना सुचली.

हेही वाचा: आहे ना कमाल! १,६९७ जणांचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार आठ हजारांवर

खेड्यातील वहिनी, मंग्या, रंजना, शंकर सारख्या कार्टून पात्राच्या माध्यमातून शेतीविषयक बाबींचे मार्गदर्शन करणारी पात्रे साकारली. त्याला स्वतःच्या आवाजाची जोड देत खास गावरान शब्दशैलीची जोड दिली. त्यामुळे ते अनेकांना आवडू लागली. आजमितीस त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे पंधराशे शेतकरी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जुळले आहे. या कार्टून व्हिडिओद्वारे त्यांनी बियाणे उगवण क्षमता, फवारणी पद्धत, पट्टापेर पेरणी, सोयाबीन मार्गदर्शन, सोयाबीन पेरणीपूर्वी करावयाची तयारी, खोडमास अळी, जुनी पेरणी व नवीन पेरणीमधील फरक आणि फायदे आदी अनेक विषय साकारले आहेत.

हेही वाचा: सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

शिक्षकांकडून प्रेरणा

राज्यातील शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा परिषद शाळांत क्रांतिकारी बदल केले. त्याचे व्हिडिओ बघून मला कार्टून व्हिडिओ बनविण्याची प्रेरणा मिळाली. राज्यात सोयाबीनची उत्पादकता जास्त असताना जिल्ह्यात ती का कमी, हा प्रश्न बेचैन करीत होता. पट्टापेर पद्धत ही यावर रामबाण उपाय असल्याने मी तो कार्टूनद्वारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला. माझा हा व्हिडिओ स्थानिकसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आवडला असल्याचे अमोल चौकडे यांनी सांगितले.

(Cartoons-give-farm-updates;-Concept-of-Amol-Chowkde)

loading image
go to top