INDvSA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; तिसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत बरोबरी

SA-Captain-de-Kock
SA-Captain-de-Kock

बंगळूर : कर्णधार क्विंटॉन डी कॉकची झंझावाती नाबाद अर्धशतकी खेळी आणि कागिसो रबाडाच्या वेगवान माऱ्याने रविवारी तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताला निष्प्रभ केले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना तब्बल 19 चेडू आणि नऊ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. 

प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 20 षटकांत 9 बाद 134 असा मर्यादित राहिला. कागिसो रबाडा, बियॉर्न फॉर्टुन आणि हेंड्रिक्‍स यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज गडबडले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 16.5 षटकांत 1 बाद 140 धावा केल्या. क्वींटॉन डी कॉक धावांवर 79 नाबाद राहिला. तेम्बा बावुमा याने नाबाद 27 धावांची खेळी करताना कर्णधाराला सुरेख साथ केली. 

आव्हानाचा पाठलाग करातना डी कॉकने पहिल्या षटकापासून घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. रिझा हेंड्रिक्‍सनेही त्याला मोलाची साथ केली. या जोडीच्या धडाक्‍याने 10 षटकांतच दक्षिण आफ्रिकेने सत्तरी गाठली होती. त्या वेळी कृणाल पंड्याने हेंड्रिक्‍सची विकेट मिळविली. त्यानंतर अवघ्या 41 चेंडूंत डी कॉक आणि बावुमा जोडीने भारताचा पराभव लिहिला. डी कॉकने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना आपल्या नाबाद खेळीत 6 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी केली. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर भारताची सुरवात कडक होती. दोन षटकांत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 22 धावा कुटल्या. त्यावेळी ब्युरन डेंड्रिक्‍सने शर्माटा अडथला दूर केला. त्यांनतर 36 चेंडूंत धवन-कोहली यांनी 41 धावा घेत भारताचा वेग कायम राखला होता. मात्र,शम्सीच्या फिरकीने धवनचा 25 चेंडूंतील 36 धावांचा झंझावात रोखला. रबाडाने कोहलीचा अडसर दूर केला.

भारताचा डाव 3 बाद 68 या धावसंख्येवरून पुढे कधीच सावरू शकला नाही. रिषभ पंत नेहमीप्रमाणे आक्रमक सुरवात करून बाद जाला. श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या यांना खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. रवींद्र जडेजाची धडपडही पुरेशी पडली नाही. त्यामुळे भारताला आपले आव्हान वाढवता आले नाही. 

संक्षिप्त धावफलक :
भारत 20 षटकांत 9 बाद 134 (शिखड़ धवन 36 -25 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, रवींद्र जडेजा 19, रिषभ पंत 19, कृणाल पंड्या 14, कागिसो रबाडा 4-0-39-3, बियॉर्न फॉर्टुइन 3-0-19-2, ब्युरन हेंड्रिक्‍स 4-0-14-2) पराबूत वि. दक्षिण आफ्रिका 16.5 षटकांत 1 बाद 140 (क्वींटॉन डी कॉक नाबाद 79 -52 चेंडू, 6 चौकार, 5 षटकार, तेम्बा बावुमा नाबाद 27 -23 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, रिझा हेंड्रिक्‍स 28, हार्दिक पंड्या 2-0-23-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com