esakal | 'डान्स पे चान्स' मारले! विराटचा व्हिडिओ होतोय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

'डान्स पे चान्स' मारले! विराटचा व्हिडिओ होतोय व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : न्यूझीलंड विरुद्धच्या मेगा फायनलमध्ये पहिल्या डावात मोठी खेळी करण्याची संधी विराट कोहलीने गमावली. दुसऱ्या दिवशी सेट झालेला विराट तिसऱ्या दिवशीच्या खेळात एकही धाव न करता तंबूत परतला. त्याच्यासोबत थांबलेल्या उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही माघारी परतला आणि भारतीय संघाचा डाव अवघ्या 217 धावांत आटोपला. भात्यातील फटकेबाजीनं चाहत्यांचा आनंद द्विगुणित करण्यास मुकलेल्या विराट कोहलीने फिल्डिंग वेळी आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच पाहणाऱ्या क्रिकेट प्रेमींची मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले. स्लिपमध्ये उभा असताना विराट कोहली भांगडा करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: WTC : आयो! अश्विनच्या बायकोचं ट्विट व्हायरल

भारतीय संघाचा डाव आटोपल्यानंतर टॉम लॅथम आणि डेवोन क्वान्वे या जोडीने न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या डावातील 9 व्या षटकात कोहली स्लिपमध्ये डान्स करताना दिसला. साउदम्टनच्या स्टेडियमवर भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेला चाहता वर्ग कोहलीचा डान्स पाहून चांगलाच खूश झाला. पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळे खेळात आलेला व्यत्यय यामुळे मेगा फायनलची मजा घालवली आहे. यात विराट कोहली आपल्या हटके आणि बिनधास्त अंदाजाने रंग भरण्याचा एक प्रयत्नच करताना दिसले.

हेही वाचा: WTC : रोहितचं कौतुक करुन माजी इंग्लिश क्रिकेटर झाला ट्रोल!

सोशल मीडियावर कोहलीचा (Kohli Dance video Viral in WTC Final) व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कोहलीच्या डान्समुळे संघातील खेळाडू आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्या ऊर्जा मिळाल्याचे दिसले. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. अश्विनने ही जोडी फोडत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले आहे. टॉम लॅथमने 104 चेंडूचा सामना करताना 30 धावा केल्या. तत्पूर्वी कायले जेमिन्सनने टीम इंडियाचा अर्धा संघ गारद केला. त्याला ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर आणि टीम साउदीनं उत्तम साथ दिली.

loading image