INDW vs NZW: स्मृतीची उणीव; महिला संघानं वनडे मालिकाही गमावली

New Zealand Women vs India Women, 3rd ODI
New Zealand Women vs India Women, 3rd ODISakal

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला न्यूजीलंड दौऱ्यावर सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकमेव टी-20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला संघाने 5 सामन्यांची कसोटी मालिकाही गमावली. तिसऱ्या वनडेत मेघना (Sabbhineni Meghana) 61(41), शफाली वर्मा (Shafali Verma) 51 (57) आणि दीप्ती शर्मानं 69 (69) केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 49.3 षटकात 279 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या महिलांनी तीन विकेट्स राखून हे आव्हान सहज पार केले.

या विजयासह न्यूझीलंड महिला संघाने घरच्या मैदानात सुरु असलेली 5 सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी खिशात घातली. दुसऱ्या वनडे सामन्यातही भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक टार्गेट दिले होते. पण अटितटिच्या लढतीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

New Zealand Women vs India Women, 3rd ODI
सचिन भारी की विराट? उत्तर खुद्द देवानंच दिलं

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यावर पकड ठवली. पण लॉरेन डाउन हिने भारतीय संघाचे इरादे उधळून लावले. लॉरेनने 52 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. तिने भारतीय संघाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. अखेरच्या षटकात षटकार खेचून तिने संघाला मालिका जिंकू दिली.

भारतीय महिला संघाने तिसऱ्या वनडेत दमदार सुरुवात केली होती. शफाली आणि मेघनाने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. पण त्यानंतर दोन वनडेत अर्धशतकी खेळी करणारी कर्णधार मिताली राज स्वस्तात आटोपली. हरमनप्रीत कौर हिला देखील नावाला साजेसा खेळ करता आला नाही. स्मृती मानधनाचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला होता. पण तरही ती प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हती.

New Zealand Women vs India Women, 3rd ODI
Video : सरफराजचं द्विशतक! मेगा लिलावात मिळाली होती कवडी मोलाची किंमत

280 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड महिला संघाची सुरुवात खराब झाली. 14 धावांत त्यांनी दोन विकेट्स गमावल्या होत्या. एमेलिया कर (67) आणि एमी सथरवेट (59) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 103 धावांची शतकी खेळी करुन डाव सावरला. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात मॅडी ग्रीन (24) आणि कॅटी मार्टिन (35) हिने लॉरेनला उत्तम साथ देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com