'चक दे! इंडिया' चित्रपट पाहून हॉकी खेळण्याची प्रेरणा... साताऱ्याचा आदित्य ललागे वर्ल्ड कप संघात; पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी सज्ज

Hockey India announces squad for FIH Hockey Men’s World Cup 2026 : 'चक दे! इंडिया' हा चित्रपट पाहून हॉकी खेळण्याची प्रेरणा मिळालेल्या साताऱ्यातील आदित्य अर्जुन ललागेने आता भारतीय हॉकीतील मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. हॉकी इंडियाने जाहीर केलेल्या एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ साठीच्या २० सदस्यीय भारतीय संघात आदित्यची निवड झाली आहे.
Aditya Lalage selected for India Hockey World Cup squad

Aditya Lalage selected for India Hockey World Cup squad

esakal

Updated on

FIH Hockey World Cup 2026 India squad: बेल्जियम व नेदरलँड्स येथे पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने मंगळवारी २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पार पडणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करणार आहे. भारतीय हॉकी इतिहासात सुवर्णाक्षराने नाव नोंदवण्याची ही संधी असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी व्यक्त केले आहे. भारताकडून सर्वाधिक सामना खेळणारा आणि प्रचंड अनुभव असलेल्या मनप्रीत सिंग याच्यासह युवा खेळाडूंचा या संघात भरणा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com