आंतरविभागीय महिला कुस्ती : "शिवराज"च्या शितलला सुवर्णपदक

अजित माद्याळे
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

गडहिंग्लज - शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय मॅटवरील मुलींच्या कुस्तीमध्ये येथील शिवराज महाविद्यालयाची विद्यार्थीनी शीतल पाटील हिने 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

गडहिंग्लज - शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय मॅटवरील मुलींच्या कुस्तीमध्ये येथील शिवराज महाविद्यालयाची विद्यार्थीनी शीतल पाटील हिने 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजची पल्लवी जाधवने रौप्य तर पाटणच्या बी.डी.सी कॉलेजची शुभांगी पाटीलने कास्य पदकावर मोहोर उमटविली. शिवराज महाविद्यालयाने या स्पर्धेचे संयोजन केले होते.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा :

76 किलो गट- स्वाती पाटील (केबीपी इस्लामपूर), सुकन्या खामकर (शिवराज गडहिंग्लज), वैष्णवी पाटील (वायसी वारणानगर),

72 किलो - ऋतुजा शिंदे (विवेकांनद कोल्हापूर), प्रियांका दुबले (आदर्श, विटा),

68 किलो-दिव्या कुंभार (वाय.सी. पाचवड), अपूर्वा पाटील (पीव्हीपी बुधगाव), धनश्री पाटील (केबीपी इस्लामपूर),

65 किलो-जस्मिन शेख (शिवाजी, सातारा), स्मिता माळी (केडब्ल्यूसी सांगली),

62 किलो- विजया पुजारी (इचलकरंजी), हर्षदा चव्हाण (एसजीएम कराड), प्रांजली कोळपे (शिंदे कॉलेज, वाई),

57 किलो- प्रेरणा गायकवाड (आदर्श, विटा), शिवानी पाटील (विवेकानंद कोल्हापूर), अश्‍विनी यादव (केबीपी इस्लामपूर),

55 किलो- प्रज्ञा बरकाळे (केएच गारगोटी), अमृता गायकवाड (केबीपी इस्लामपूर), संध्याराणी सावंत (इस्लामपूर),

53 किलो - सवाती शिंदे (मंडलिक, मुरगूड), विजया पोवार (घाळी गडहिंग्लज),

50 किलो-एकता पाटील (शहाजी कोल्हापूर), शिवानी सुतार (आदर्श विटा), कोमल जाधव (कमला कोल्हापूर).

सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. पंच शंकर कुरळे, रवींद्र डोंगरे, अशोक कदम, प्रकाश धबाले, विठ्ठल भम्मानगोळ, सागर शिंदे, उमेश रामजी, प्रभाकर खांडेकर, जयवंत पाटील, विश्‍वास खोत, प्रकाश पोवार आदीसह लाल आखाडा, हनुमान आखाडा लिंगनूर व नूल, पाटील आखाडा मुत्नाळ, कडगाव व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. 

Web Title: Inter-Woman Wrestling competition Shital wins Gold Medal