Video : पाकचा माजी क्रिकेटपटू म्हणतोय, 'या' तिघांनी बदलंल क्रिकेटविश्व!

Viv-Sanath-ABD
Viv-Sanath-ABD

फुटबॉलनंतर क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. अनेक देशांमध्ये हा खेळ खेळला जात असून याला लोकप्रिय बनविण्यात अनेक महान खेळाडूंचा हातभार लागला. 

क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या तीन खेळाडूंची नावे पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकने जाहीर केली आहेत. इंझमामच्या मते, वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्ड्स, श्रीलंकेचा माजी कॅप्टन आणि डावखुरा सलामीवीर सनथ जयसूर्या आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन तडाखेबंद फलंदाज एबी डिव्हिलिअर्स यांनी क्रिकेटला नवी दिशा दिली. त्यांनी क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला. 

क्रिकेट लोकप्रिय होण्याच्या सुरवातीचा काळ गाजवला तो व्हिवियन रिचर्ड्स यांनी. ते जगातील आक्रमक फलंदाजांपैकी एक होत. १९८० च्या काळात त्यांची क्रिकेट विश्वात दहशत होती. बाकीचे खेळाडू बॅकफूटवर खेळत असताना रिचर्ड्स यांनी फ्रंटफूटवर खेळून फास्ट बॉलरवरही प्रेशर आणले होते. त्यामुळे ते क्रिकेटमधील महान खेळाडू आहेत, असे इंझमामने म्हटले आहे. 

“व्हिव रिचर्ड्स यांच्यानंतर क्रिकेट बदलण्याचा प्रयत्न केला, तो श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने. पहिला पॉवरप्ले आणि १५ ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स कशा काढता येतील, याचं तंत्र जयसूर्यानं शोधून काढलं. त्याच्या आधीच्या काळात हवेत बॉल भिरकावणाऱ्यांना बॅट्समन म्हणून ओळखले जाई. मात्र, जयसूर्याने ३० यार्ड सर्कलमध्ये जास्तीत जास्त फिल्डर असताना फटकेबाजी करण्यात प्राधान्य दिलं. आणि आक्रमक बॅटिंग केल्यावर काय फरक पडतो, याची क्रिकेट विश्वाला ओळखही करून दिली.  

त्यानंतर अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये बदल घडवून आणला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने कमाल केली. वनडे आणि टी-२० मध्ये तर क्रिकेटचे स्पीड वाढले डिव्हिलिअर्समुळेच. डिव्हिलिअर्सच्या आधीच्या फळीत जेवढे बॅट्समन झाले, ते तांत्रिकदृष्ट्या सरळ बॅटने शॉट मारत होते. पण, डिव्हिलिअर्सने पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप मारण्यास सुरवात केली, आणि क्रिकेटच बदलून गेले, असे इंझमाम म्हणाला. 

तो पुढे म्हणाला की, या तिघांचे वैशिष्ट्य म्हणजे ते परफेक्ट बॅट्समन आहेत. आणि त्यांच्यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक शक्ती आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com