IPL 2020 : 'राहुल, नाम तो सुना ही होगा'; यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक

टीम ई-सकाळ
Thursday, 24 September 2020

के. एल. राहुल ८३ धावांवर असताना त्याला पहिल्यांदा तर ९० धावांवर असताना त्याला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं.

IPL 2020 : KIXPvsRCB : दुबई : यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सामन्यातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) यांच्यात खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ओपनर जोडीत आज बदल केल्याचे दिसून आले. मागील सामन्यात धमाकेदार खेळी करणाऱ्या मयांक अगरवालला बढती देण्यात आली होती. 

दिग्गज क्रिकेटपटू, समालोचक डिन जोन्स यांचं निधन; 'आयपीएल'ला बसला धक्का!​

पंजाबचा कॅप्टन के. एल. राहुल आणि मयांकने डावाला सावध सुरवात केली. मात्र, या सामन्यात मयांकला मोठी खेळी करता आली नाही. तो 26 धावा काढून माघारी परतला. मात्र, राहुलने एक बाजू लावून धरत ६२ चेंडूत शतक झळकावले. ओपनिंगला येऊन पूर्ण २० ओव्हर मैदानावर टिकून राहिलेल्या राहुलने ६९ बॉलमध्ये नाबाद १३२ धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने १४ फोर आणि ७ सिक्स टोलवले.

जाणून घ्या आयपीएलमागच्या आर्थिक उलाढाली...​

दोन वेळा मिळालं जीवदान

के. एल. राहुल ८३ धावांवर असताना त्याला पहिल्यांदा तर ९० धावांवर असताना त्याला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं. विशेष म्हणजे दोन्ही वेळा तो कॅच आऊट होताना बचावला आणि दोन्ही वेळा विराट कोहलीनेच त्याचे कॅच सोडले.

राहुल नंबर वन

बेंगलोरविरुद्धच्या आजच्या मॅचमध्ये राहुलने नाबाद १३२ धावा केल्या. ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. याचबरोबर आयपीएलमध्ये एका मॅचमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्यांच्या यादीत तो टॉपर ठरला आहे. या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत (नाबाद १२८), चेन्नई सुपर किंग्जचा मुरली विजय (१२७), विरेंद्र सेहवाग (१२२) आणि पॉल वॉल्थॅटी (१२०) यांचा नंबर लागतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL 2020 6th match KIXP vs RCB K L Rahul scored his first century