IPL 2020 SRH v RCB : विराट कोहली अपयशी, पण  त्याचा बंगळूर संघ विजयी 

IPL2020 SRH v RCB 3rd Match
IPL2020 SRH v RCB 3rd Match

दुबई : IPL 2020,  SRH v RCB 3rd Match  सर्वांचे लक्ष लागून राहिलेला विराट कोहली स्वतः फलंदाजीत अपयशी ठरला परंतु त्याचा बंगळूर संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना 10 धावांनी जिंकण्यात कसाबसा यशस्वी ठरला. हैदराबादविरुद्धचा सामना हातून निसटत असताना युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूत दोन विकेट मिळवले आणि तेथूनच कलाटणी मिळाली. 

बंगळूरच्या 163 धावांसमोर हैदराबादने बेअरस्टॉच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 2 बाद 121 अशी मजल मारली होती त्यावेळी त्यांना विजयासाठी 30 चेंडूत 43 धावा हव्या होत्या, परंतु चहलने सलग दोन चेंडूंवर बेअरस्टॉ आणि विजय शंकर यांना बाद केले तेथूनच सामन्याचा रंग पलटला. 

पदिक्कलची पदार्पणात चमक 

तत्पूर्वी, बंगळूर संघाने आज अनुभवी सलामीवीर पार्थिव पटेलऐवजी देवदत्त पदिक्कल या नवोदिताला प्रथमच संधी दिली. राष्ट्रीय ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या देवदत्तने अनुभवी आणि ऑस्ट्रेलिया कर्णधार फिन्चलाही मागे टाकून खणखणीत टोलेबाजी केली. त्याच्या फटक्‍यांमधील चमक सर्वांना प्रभावीत करणारी होती. फिन्चसह त्याने 90 धावांची सलामी देऊन विराट आणि डिव्हिल्यर्स यांच्यासाठी भक्कम पायाभरणी केली, परंतु दोघेही याच धावसंखेवर लागोपाठ बाद झाल्याने विराट आणि डिव्हिल्यर्स यांना सावध पवित्रा घ्यावा लागला. 

सहा महिन्यानंतर खेळणाऱ्या विराटला 13 चेंडूत 14 धावाच करता आल्या त्यात त्याला एकही चौकार मारता आला नाही, परंतु डिव्हिल्यर्सने जम बसल्यावर पवित्रा बदलला त्याच्या वेगवान अर्धशतकामुळे बंगळूरला दीडशतकाच्या पुढे मजल मारता आली. 


संक्षिप्त धावफलक : बंगळुर 20 षटकांत 5 बाद 163 (देवदत्त पदिक्कल 56 -42 चेंडू, 8 चौकार, ऍरॉन फिन्च 29 -27 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार विराट कोहली 14 -13 चेंडू, एबी डिव्हिल्यर्स 51 -30 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, नटराजन 34-1, विजय शंकर 14-1, अभिषेक शर्मा 16-1) वि. हैदराबाद  19.4 षटकांत सर्वबाद 153 (बेअरस्टॉ 61 -43 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार मनिष पांडे 34 -33 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, चहल 18-3, नवदीप सैनी 25-2, शिवम दुबे 15-2)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com