esakal | VIDEO : जोकोविचनं रागाच्या भरात तोडलं रॅकेट
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic

VIDEO : जोकोविचनं रागाच्या भरात तोडलं रॅकेट

sakal_logo
By
सुशांत जाधव

अमेरिकन ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात (US Open Final) सर्बियाच्या नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) याने 6-4, 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये नंबर वन जोकोविचला शह देत वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले. या सामन्यात लढतीमुळे जोकोविचचं कॅलेंडर स्लॅमच्या स्वप्नाचा चक्काचुरा झाला. आपल्या स्वत:च्या कामगिरीवर तो निराश झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने याचा राग आपल्या रॅकेटवर काढला. त्याने हातातील रॅकेट जोराने आदळत तोडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कधी तोडलं रॅकेट?

जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यातील सामना एकतर्फी झाला. सुरुवातीपासूनच मेदवेदेवने सामन्यावर वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले. जोकोविच कमबॅक करण्याचे प्रयत्न करत होता आणि दुसरीकडे मेदवेदेव त्याचा प्रयत्न हाणून पाडत होता. सामना सुरु होऊन जवळपास दीड तासाच्या खेळानंतर जोकोविच हतबल झाल्याचे दिसले. सामन्यात कमबॅक करण्यात अपयश येत असल्याचा राग त्याने हातातील रॅकेटवर काढला. त्याने रॅकेट जोरात कोर्टवर आदळले. याप्रकरणी त्याला वॉर्निंगही देण्यात आली.

हेही वाचा: शास्त्रींनंतर द्रविड होणार भारताचा कोच? गांगुली म्हणतो...

अश्रू झाले अनावर...

सामना संपल्यानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले. आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी त्याने प्रतिस्पर्धी मेदवेदेवच्या खेळीला टाळ्या वाजवून दाद दिली. तिसऱ्या सेटमध्येच त्याच्या अश्रू अनावर झाले होते. सामना आपल्या हातून निसटल्यामुळे पहिल्यांदाच तो इतका हताश झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: US Open Final: मेदवेदेवनं नंबर वन जोकोविचला रडवलं!

21 व्या ग्रँडस्लॅमसह कॅलेंडर स्लॅमचे स्वप्न अधूरेच

जोकोविचसाठी हा सामना खास असाच होता. जर त्याने सामना जिंकला असता तर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या पुढे जाऊन सर्वाधिक ग्रँडस्लॅम आपल्या नावे करण्याची त्याच्याकडे संधी होती. पुरुष गटात स्पेनचा राफेल नदाल, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि जोकोविच यांच्या नावे प्रत्येकी 20-20 ग्रँडस्लॅमची नोंद आहे.

loading image
go to top