esakal | रवी शास्त्रींनंतर राहुल द्रविड बनणार भारताचा कोच? सौरव गांगुली म्हणतो...
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi-Shastri-Rahul-Dravid

शास्त्रींनंतर द्रविड होणार भारताचा कोच? गांगुली म्हणतो...

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup 2021नंतर शास्त्रींचा कार्यकाळ संपणार

T20 World Cup 2021: भारतीय संघ गेल्या काही वर्षात ICC ने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धांचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही. २०१९मध्ये झालेल्या वन डे विश्वचषक (ODI World Cup 2019) स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये बाहेर पडावे लागले. २०२१मध्ये झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (World Test Championship 2021) टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष २०२१च्या टी२० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेकडे लागले आहे. ही स्पर्धेसोबतच भारताचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे. त्यांच्या जागी नवे कोच कोण असा सवाल काही दिवसांपासून चर्चिला जात आहे. काही जाणकार आणि सूत्रांच्या मते, राहुल द्रविडला (Rahul Dravid) या जागी निवडलं जाण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) महत्त्वाची अपडेट दिली.

हेही वाचा: T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेतील ३ उल्लेखनीय गोष्टी

BCCI चे काही सदस्य माजी फलंदाज राहुल द्रविड याच्याशी प्रशिक्षकपदाबद्दल चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने उत्तर दिलं. तो म्हणाला, "मला असं वाटतं की टीम इंडियाचं प्रशिक्षकपद पूर्णवेळ सांभाळण्यासाठी राहुल द्रविड उत्सुक नसेल. अजून आम्ही त्याच्याशी या विषयावर काहीही चर्चा केलेली नाही, पण जर चर्चा करायची असेल तर वेळ आली की बघू."

महेंद्रसिंग धोनीला मार्गदर्शक म्हणून संघासोबत समाविष्ट करण्याची कल्पना कुणाची होती? असाही प्रश्न गांगुलीला विचारला. त्यावर तो म्हणाला की कल्पना कोणाचीही असली तरी फरक पडत नाही. मुख्य मुद्दा आहे भारताची चांगली कामगिरी व्हायला हवी. त्यामुळे त्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Sourav Ganguly

Sourav Ganguly

हेही वाचा: IND vs SL: द्रविड गुरूजी लंका दौऱ्यात 'या' क्रिकेटपटूवर नाराज

रवी शास्त्री आणि टीम इंडिया

रवी शास्त्री भारतीय संघासोबत सर्वप्रथम २०१४ मध्ये संचालक म्हणून कार्यरत झाले. २०१६ टी-२० विश्वचषक संपेपर्यंत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर वर्षभरासाठी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला. त्यानंतर शास्त्रींना पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नेमण्यात आले. पण ICCच्या स्पर्धांमध्ये मात्र भारताला अद्याप विजेतेपद मिळालेले नाही.

loading image
go to top