esakal | धवनच्या खेळीनं दिल्ली शिखरावर; हैदराबाद सूर्यास्ताच्या दिशनं

बोलून बातमी शोधा

DCVSPBKS
धवनच्या खेळीनं दिल्ली शिखरावर; हैदराबाद सूर्यास्ताच्या दिशनं
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मयांक अग्रवालच्या नाबाद 99 धावांच्या खेळीवर शिखर धवनच्या 69 धावांची नाबाद खेळी भारी पडली. त्याच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 7 गडी आणि 14 चेंडू राखून आणखी एक दिमाखदार विजय नोंदवलाय. 8 सामन्यातील 6 सामन्यातील विजयासह दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात 12 गुण जमा झाले असून पाँइंट टेबलमध्ये ते पहिल्या स्थानावर पोहचले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज 7 पैकी 5 सामन्यातील विजयासह 10 गुणांसह दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स 7 पैकी 5 सामन्यातील विजयासह 10 गुणासंह तिसऱ्या तर मुंबई इंडियन्सचा संघ 7 पैकी 4 सामन्यातील विजयासह 8 गुण मिळवून चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: IPL 2021: कॅप्टन्सीचं ओझं मयांकनं रेकॉर्ड करुन पेललं, पण...

डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. या सामन्यातील विजयासह 7 पैकी तीन सामन्यातील विजयासह राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर पंजाब किंग्ज संघाची एका स्थानाने घसरण झाली असून 8 पैकी 3 सामन्यातील विजयासह ते 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. कोलकाताना 7 सामन्यात केवळ दोन गुण मिळवले असून सनरायझर्स हैदराबादला एवढ्याच सामन्यात केवळ एक सामना जिंकता आला आहे.

हेही वाचा: VIDEO : रबाडासमोर गेल भाऊ गडबडला? फुलटॉसवर उडाल्या दांड्या

लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत मयांकच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरलेल्या संघाची सुरुवात खराब झाली. एका बाजूने विकेट पडत असताना मयांक अग्रवालने शेवटपर्यंत मैदानात तग धरत 99 धावांची खेळी करुन संघाचा डाव सावरला. त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या जोडीने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉने 22 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. ब्रारने त्याची विकेट घेतली. स्टीव्ह स्मिथच्या रुपात मेरेडिथने 24 धावांवर चालते केले. क्रिस जार्डनच्या गोलंदाजीवर रिषभ पंतची विकेट घेतली. दुसऱ्या बाजूला शिखर धवनने 47 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 69 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 8 सामन्यातील 3 अर्धशतकाच्या मदतीने शिखर धवनने 380 धावा केल्या असून ऑरेंज कॅप आता त्याच्याकडे आली आहे.