esakal | IPL 2021 : परदेशी खेळाडूंसाठी BCCI कडून दोन विशेष विमानं
sakal

बोलून बातमी शोधा

polard

IPL 2021 : परदेशी खेळाडूंसाठी BCCI कडून दोन विशेष विमानं

sakal_logo
By
सुशांत जाधव

युएईत रंगणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला शुभांरभ होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. इंग्लंड दौऱ्यावरील सर्व भारतीय खेळाडू आयपीएलसाठी युएईमध्ये पोहचले आहेत. त्यानंतर आता वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रिमीयर लीग आणि श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकन खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी आणण्यासाठी बीसीसीआयने हालचाली सुरु केल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत वेगवेगळ्या फ्रेंचायझी संघाकडून खेळणारे वेस्ट इंडिजचे खेळाडू सध्या कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये व्यस्त आहेत. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून 15 सप्टेंबरला फायनल खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेतील खेळा़ड़ूंना आयपीएल स्पर्धेसाठी युएईत आणण्यासाठी बीसीसीआयने दोन विशेष विमान बुक केली आहेत. या खास विमानातून परदेशी खेळाडूंना युएईत आणण्यात येणार आहे.

हेही वाचा: यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीनं दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेत आहेत. यात चेन्नईचा सलामीवीर फाफ ड्युप्लेसीस, ड्वेन ब्रावो, इम्रान ताहिर ही मंडळी कॅरेबियन लीगमध्ये खेळत आहेत. तर लुंगी एनिग्डी श्रीलंका दौऱ्यावर आहे.

हेही वाचा: IPL 2021 कोणता संघ जिंकेल? माजी क्रिकेटपटूने बांधला अंदाज

मुंबई इंडियन्सचा केरॉन पॉलार्ड कॅरेबियन लीगमध्ये तर क्विंटन डिकॉक श्रीलंका दौऱ्यावरील दक्षिण आफ्रिका संघाचा भाग आहे. हे सर्व खेळाडू बायोबबल वातावरणातच आहेत. त्यामुळे युएईमध्ये पोहचल्यानंतर दोन दिवसातच ते आपापल्या संघाला जॉईन होतील. त्यांना कोणत्याही प्रकारे 6 दिवसांच्या क्वांरटाईनची आवश्यकता नाही.

loading image
go to top