esakal | IPL 2021 कोण जिंकेल? माजी भारतीय फलंदाजांने व्यक्त केला अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI IPL 2021

पाहा, तुम्हाला पटतंय का त्यांचं मत...

IPL 2021 कोणता संघ जिंकेल? माजी क्रिकेटपटूने बांधला अंदाज

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021: भारतीय संघाची इंग्लंडविरूद्धची शेवटची कसोटी पुढे ढकलण्यात आली. मुख्य कोच रवी शास्त्री आणि ज्युनियर फिजीओ योगेश परमार या दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंनी सामना खेळायला नकार दिला. त्यानंतर आता जवळपास सर्व खेळाडू IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यासाठी युएईमध्ये दाखल झाले आहे. सहा दिवसांचे सक्तीचे क्वारंटाइन संपवून मूळ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने IPL Final बद्दल एक भविष्यवाणी केली आहे.

हेही वाचा: IPL 2021: "विराटच्या RCB ला जर स्पर्धा जिंकायची असेल तर..."

आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून भारतीय माजी फलंदाज आकाश चोप्रा याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने प्रश्नोत्तरांचे सत्रही ठेवले. त्यात अनेक चाहत्यांनी आकाश चोप्राला विविध प्रश्न विचारले. त्यात एका चाहत्याने विचारले की यंदाच्या IPL चा विजेता संघ कोण असेल? आकाश चोप्राने या प्रश्नाने स्पष्ट शब्दात उत्तर देणं टाळलं. पण अंतिम सामना मात्र मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये होणार असल्याचं भाकित त्याने केलं.

हेही वाचा: IPL 2021 : DC च्या ताफ्यात इंग्लिश मॅनच्या जागी ऑस्ट्रेलियन

दरम्यान, IPL च्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये आकाश चोप्राची निवड झाली आहे. यंदा IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यासाठी इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, किरण मोरे, निखिल चोप्रा, तानया पुरोहित, आकाश चोप्रा, जतिन सप्रू, सुरेन सुंदरम हे हिंदी समालोचक म्हणून काम पाहणार आहेत. तर, हर्षा भोगले, सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोप्रा, इयन बिशप, अँलन विल्कीन्स, पॉमी बांग्वा, निकोलस नाईट, डॅनी मॉरिसन, सायमन डुल, मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसन हे कॉमेंटेटर असणार आहेत.

loading image
go to top